पुणे: पुण्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात (tempo-car accident) तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावरील तोडकर वस्ती येथे हा भीषण अपघात घडला.
हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्तीजवळ टेम्पो आणि कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील कविता बोरूडे(वय ४० वर्षे), योगिता बोरुडे(वय ४० वर्षे) आणि कार ड्रायव्हर राजू शिंदे(वय २५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर कारमधील किशोरी बोरूडे(वय १७ वर्षे) तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे आणि श्रीराम बापूराव मांडे हे तीन जण जखमी झाले. जखमींना तातडीने रूग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तसेच अपघातातील मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत.