Tuesday, May 13, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

Ganeshostav : गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

Ganeshostav : गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील गणेशोत्सव म्हटला की ढोलताशा पथक, मिरवणुका, विसर्जन सोहळा हे सर्व काही मोठ्या थाटामाटात असते. कोरोनामुळे दोन-तीन वर्षे गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरी करताना अनेक प्रकारच्या अटी होत्या. मात्र यंदा गणेशोत्सवात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. यंदा लाऊडस्पीकर लावण्याबाबत सरकारकडून मोठी सूट देण्यात आली आहे.


गणेशोत्सवातील ४ दिवस १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिभावकर यांनी दिली आहे. परवानगी देण्यात आलेले हे चार दिवस म्हणजे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन तसेच ५, ९ तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment