Sunday, July 7, 2024
Homeक्रीडाIndia vs Nepal: नेपाळला हरवत भारत आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये

India vs Nepal: नेपाळला हरवत भारत आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये

पल्लेकल: भारत आणि नेपाळ (India vs nepal) यांच्यात रंगलेल्या आशिया चषकातील सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला आहे. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १० विकेट राखत पूर्ण केले.

या सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळच्या संघाला २३० धावाच करता आल्या. त्यानंतर भारताने फलंदाजीस सुरूवात केली मात्र त्याचवेळी पावसाने खोडा घातला.

पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर सामन्यातील षटके कमी करण्यात आली. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावा करायच्या होत्या. भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली फटकेबाजी करत हे आव्हान पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला.

सलामीवीर रोहित शर्माने ५९ बॉलमध्ये ७४ धावा केल्या तर सलामीवीर शुभमन गिलने ६२ बॉलमध्ये ६७ धावांची खेळी केली. भारताने आपला एकही विकेट न गमावता नेपाळचे १४५ धावांचे आव्हान पूर्ण केले.

याआधी भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे केवळ एकच गुण मिळाला होता. त्या सामन्यात भारताने फलंदाजी केली मात्र त्यानंतर पाऊस आल्याने पाकिस्तानला फलंदाजी करता आली नाही. पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने अखेर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. याच्या जोरावर पाकिस्तानचा संघ सुपर ४मध्ये पोहोचला. त्यानंतर आता भारताने सुपर ४ची फेरी गाठली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -