मुंबई: आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुनिंबाचे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. कडुनिंबाची चव जरी कडवट लागत असली तरी मात्र त्याच्यात अनेक औषधीय गुण असतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाचे सेवन केल्यास शरीराचे अधिक आजार बरे होतात. जाणून घ्या रिकाम्या पोटी कडुनिंब खाण्याचे फायदे
ब्लड शुगर नियंत्रणात
खराब लाईफस्टाईलमुळे भारतात सातत्याने डायबिटीज रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, लोक अजूनही घरगुती उपायांवर विश्वास ठेवतात. कडुनिंबाच्या पानांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रक्त साफ करण्यात मदत
कडुनिंबामध्ये असे औषधीय गुण आहेत जे रक्त साफ करण्यास मदत करतात. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. रक्त साफ असेल तर तुम्हाला आजार होणार नाहीत.
पोटासाठी फायदेशीर
कडुनिंबामुळे आपली त्वचाच नव्हे तर पोटही चांगले राहते. यातील गुण अॅसिडिटीसाठी फायदेशीर ठरतात. रिकाम्या पोटी पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून प्यायल्याने अॅसिडिटी तसेच पोटदुखी बरी होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
कडुनिंबाच्या पानामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच अँटी ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतात. तसेच सर्दी, खोकला सारखे आजारही दूर राखण्यास मदत करतात.