Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वStock market : ‘चांद्रयान ३’ आणि शेअर बाजार...

Stock market : ‘चांद्रयान ३’ आणि शेअर बाजार…

  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

मागील आठवड्यात ‘चांद्रयान ३’ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. ‘चांद्रयान ३’ च्या यशस्वी मोहिमेत अनेक भारतीय कंपन्या देखील समाविष्ट होत्या. त्यांनी ‘चांद्रयान ३’ च्या निर्मिती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ‘चांद्रयान ३’ मध्ये एकूण १३ कंपन्या समाविष्ट होत्या. यशस्वी मोहिमेनंतर त्यांच्या समभागामध्ये देखील चांगली वाढ दिसून आली. समाविष्ट १३ कंपन्यांमध्ये लिंडे इंडिया, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड, भेल, बीईएल, लार्सेन अँड टुब्रो, अवान्टेल, पारस डिफेन्स, एमटीएआर टेक्नोलॉजी लिमिटेड, मिधानी या प्रामुख्याने १० कंपन्या होत्या.

यामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानात ‘भेल’ या कंपनीने ‘चांद्रयान ३’ मोहिमेसाठी लँडर मोड्यूल आणि बँटरी तयार केल्या. ‘एमटीएआर टेक्नोलॉजी लिमिटेड’ या कंपनीने व्हेईकल इंजिन आणि बुस्टर पंप इस्रोला दिले. ‘लार्सेन अँड टुब्रो’ या कंपनीने चांद्रयान ३ साठी हेड एंड सेग्मेंट मिडल सेगमेंट आणि नोजल बकेट फ्लॅज यासारखे महत्वाचे बुस्टर सेगमेंट तयार केले. ‘सेंटम इलेक्ट्रॉनिक्स’ यांनी स्पेस अॅप्लिकेशनसाठी इलेक्ट्रॉनिक सिस्टीमची रचना आणि निर्मिती केली. ‘मिधानी’ या कंपनीने प्रक्षेपण वाहनासाठी महत्त्वपूर्ण साहित्य पुरविले. ‘पारस डिफेन्स अँड टेक्नोलॉजी’ यांनी ‘चांद्रयान ३’ साठी नेव्हिगेशन सिस्टीमचा पुरवठा केला. ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ यांनी मेकॅनिकल हार्डवेअर पुरविली. त्यामुळे सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झालेली आहे. या सर्वांमध्ये मुलुभूत विश्लेषणानुसार माझ्या अभ्यासानुसार इतरांच्या तुलनेत दीर्घमुदतीसाठी आणखी चांगली वाढ होऊ शकणारी कंपनी म्हणजे ‘एमटीएआर टेक्नोलॉजी लिमिटेड’.

‘एमटीएआर टेक्नोलॉजी लिमिटेड’ या कंपनीची स्थापना १९७० मध्ये झाली. ही कंपनी विविध मशीन उपकरणे, असेंब्ली, सब-असेंब्ली, आणि उर्जा, अणू, अवकाश, एरोस्पेस, संरक्षण आणि इतर अभियांत्रिकी, उद्योगांसाठी सुटे भाग तयार करण्याच्या व्यवसायात आहे. ‘न्युक्लीअर सेगमेंट’ विभागात ही कंपनी अणुभट्ट्यांसाठी इंधन मशिनिंग हेड, ड्राईव्ह मेकॅनिझम, ब्रिज आणि कॉलम इत्यादी सारखे जटील घटक आणि असेंब्ली तयार करते. ‘स्पेस आणि डिफेन्स’ विभागात लिक्विड प्रोपल्शन रॉकेट इंजिन्स, क्रायोजेनिक इंजिन्स तयार करते. इतर उत्पादनात कंपनी हाय एन्ड फॅब्रीकेशन, रोलर स्क्रू, इलेक्ट्रो मेकॅनिकल अॅक्यूएटर देखील आहेत. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रकल्पात पीएसएलव्ही सी २५ साठी पुरविलेले इंजिन ज्याने मार्स ओर्बिटर मिशन स्पेसक्राफ्ट लाँच केले. चांद्रयान २ मोहिमेसाठी इंटिग्रल यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे असलेल्या प्रमुख ग्राहकात ब्लुम एनर्जी, एल्बिट, राफेल, इस्रो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र यांचा समावेश आहे. काही इतर भारतीय कंपन्या देखील त्यांच्या ग्राहक आहेत. ज्यामध्ये भेल, भारत डायनामिक, एचएएल यांचा समावेश आहे. आज कंपनीकडे एक्स्पोर्ट ओरीएंटेड युनिटसह ७ उत्पादन युनिट्स आहेत. या कंपनीने १.०३ कोटी इक्विटी शेअर्ससाठी ५७५ रुपयांच्या एकूण ५९६ कोटी रुपयांच्या किंमतीचा आयपीओ आणला होता. सध्या कंपनीला इनहाउस इलेक्ट्रॉनिक्स मॅन्यूफॅक्चरिंग युनिट स्थापना करण्यासाठी तत्वत: मान्यता मिळालेली आहे. याशिवाय कंपनीने एएसपी असेंब्लीचे प्रोटोटाइप तयार केलेले आहेत.

आज ८३०० करोड मार्केट कॅपिटल असलेल्या या कंपनीची फेसव्हल्यू १० असून सध्या २७२४ रुपये किंमतीला असणाऱ्या शेअर्समध्ये दीर्घमुदतीचा विचार करता म्हणजे पुढील १० वर्षांचा विचार करता चांगली वाढ होऊ शकते. त्यामुळे पुढील काळात या कंपनीच्या शेअरमध्ये येणाऱ्या करेक्शन किंवा निर्देशांकात येणाऱ्या करेक्शनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्यानी खरेदी करत गेल्यास चांगला फायदा होऊ शकेल. मागील काही महिन्यांत या शेअरमध्ये फार मोठी वाढ झालेली असल्याने पुढील काळात या शेअरमध्ये करेक्शन येणे अपेक्षित आहे त्यामुळे गुंतवणूक करत असताना एकदमच सर्व गुंतवणूक एकाच किंमतीला करू नये. मात्र प्रत्येक घसरणीत याचा विचार करता येईल. टेक्नीकल अॅनालीसीसनुसार शेअर बाजार हा तेजी दर्शवित असून पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची १९२०० ही महत्वाची पातळी असून जोपर्यंत निर्देशांक या महत्त्वाच्या पातळीच्यावर तोपर्यंत निर्देशांकातील तेजी टिकून राहील. अल्पमुदतीचा विचार आयआरएफसी, भेल, एमसीएक्स, सेल ह्यासह अनेक शेअर्सची दिशा टेक्निकल अॅनालीसीसनुसार तेजीची असून या शेअर्समध्ये योग्य स्टॉपलॉस लावून तेजीचे व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. गुंतवणूक करीत असताना आपल्या एकूण भांडवलाचे योग्य नियोजन करून गुंतवणूक करणे आवश्यक असते.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)

samrajyainvestments @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -