फिल्में सिर्फ तीन चिजों से चलती हैं
entertainment entertainment & entertainment. पण विचार करा की, जर चित्रपटात खलनायकच नाही, तर चित्रपट कसा दिसेल. म्हणजेच की ब्लॉकबास्टर ठरलेला चित्रपट शोलेमध्ये जर गब्बर सिंगच नसता आणि मिस्टर इंडिया चित्रपटात मोगॅम्बोच नसता, तर चित्रपट पाहण्यात मज्जा आली असती का? अर्थातच नाही. कारण चित्रपटात जितका नायक महत्त्वाचा तितकाच खलनायकदेखील. कारण, नायकाला नायक बनवतो तो असतो खलनायक.
भारतीय चित्रपट तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. बॉलिवूड चित्रपटाची भुरळ, तर भल्याभल्यांना पडली आहे. बॉलिवूड चित्रपटातील नायक-नायिकांचे भारताबाहेरदेखील चाहते आहेत.. आपल्याकडील चित्रपटात मेलोड्रामा असतो आणि याच मेलोड्रामाच्या प्रेमात लोक पडतात पण चित्रपटातील नायक आणि नायिकेवर जितक प्रेम केलं जात तितकच प्रेम चित्रपटातील खलनायकावरदेखील केल जात. म्हणजेच काय तर रूपेरी पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारे कलाकार अंगावर जितके शहारे आणतात, तितकेच त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ अस स्थ्यान निर्माण केलंय.म्हणूनच म्हंटले जाते की ‘नायक नहीं खलनायक हूं मैं!’
अनेक कसलेल्या कलाकारांनी खलनायक रंगवून आपली स्वतःची अशी एक इमेज तयार केली आहे… आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अनेक कलाकारांनी या खलनायकाला मोठ केलं आहे. कसलेल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा एक चाहतावर्ग बनवला. आजही त्यांचे चाहते त्यांना बघायला गर्दी करतात. नायकाच्या भूमिकेला जितक प्रेम मिळत तितकंच प्रेम खलनायकाच्या भूमिकेलादेखील मिळत आहे.कसलेल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर खलनायकाच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.
आजही बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे खलनायकाच्या भूमिकेमुळे जास्त गाजले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला चित्रपट ‘शोले’ याच चित्रपटात बसंतीला नाचवणारा गब्बर सिंग भल्या भल्यानच्या अंगावर काटा आणतो. शोले चित्रपटात अमजद खान यांनी साकारलेले गब्बर सिंग ही भूमिका अजरामर झाली. आजही अमजद खान यांना त्यांच्या नावानी न ओळखता गब्बर या नावानीच ओळखलं जात आहे. जय आणि विरूच्या डायलॉगपेक्षा गब्बर सिंगचे डायलॉग जास्त लोकप्रिय झाले. ‘आरे ओ संभा कितने आदमी थे’, ‘जब दूर गाव मे कोई बच्चा रोता है तो माँ केहती है चूप हो जा नहीं तो गब्बर आयेगा’ या डायलॉग्सनी तर धुमाकूळ घातला होता. मिस्टर इंडिया या चित्रपटात, तर अमरीश पुरी यांनी साकारलेला मोगॅम्बो तर कधीच कुणी विसरू शकत नाही.’ मोगॅम्बो खुश हुआ’ अस म्हणत संपूर्ण चित्रपटात मोगॅम्बो भाव खाऊन जातो.अमरीश पुरी यांनी साकारलेला मोगॅम्बो आजही लोकांच्या मनात कायम आहे.
दिग्गज अभिनेते प्राण आपल्या दमदार अभिनयाने खलनायकाचे बादशाह बनले.. प्राण, अमजद खान, अमरीश पुरी, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, गुलशन ग्रोव्हर, अनुपम खेर, परेश रावल, संजय दत्त, डॅनी या सगळ्या कलाकारांनी आपल्या कसलेल्या अभिनयातून खलनायकाला मोठ केलं. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून खलनायकाला न्याय दिला.. भरदस्त आवाज, अक्राळ-विक्राळ हास्य, चेहऱ्यावर क्रूरतेचे भाव, दृष्ट नजर आणि चालाकी या सगळ्या माध्यमातून खरा खलनायक काय असतो हे दाखूवन दिले. इतकंच काय तर खलनायक या नावावर चक्क बॉलिवूड सिनेमादेखील बनवण्यात आला.
जसा काळ बदलत गेला तसा चित्रपटातील खलनायक देखील बदलत गेला. पूर्वी सावकारी, डाकू असणारा खलनायक नंतर पोलीसवाला खलनायक झाला आणि त्यानंतर राजकीय नेता झाला इतकंच काय, तर आताच्या सिनेमात विनोदवीर खलनायक देखील बघायला मिळत आहे. अनेक कलाकारांना खलनायकेच्या भूमिकेचं. महत्त्व पटलं. म्हणून तर अगदी नायकाच्या भूमिकेत झळकणारे कलाकार खलनायकाची भूमिकादेखील करू लागले त्यामुळे एकच आहे की खलनायकशिवाय चित्रपट हा अपूर्णच आहे आणि बॉलिवूडदेखील खलनायकशिवाय अधुराच आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…