
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात रात्री दोन मजल्याची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. यात एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण यात जखमी झालेत. अपघाताची माहिती तातडीने आसपासच्या लोकांनी पोलीस तसेच प्रशासनाला दिली. सूनाच मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका परिसरातील दर्गा रोडवर ही घटना घडली. येथील ही इमार नंबर ४४१ रात्री सव्वाबाराच्या सुमारास अचानक कोसळली. घरातून किंकाळ्यांचे आवाज ऐकू आल्याने परिसर जागा झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील ७ जण दबले गेले आहे. लोकांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने तेथे पोहोचले आणि याची माहिती पोलीस तसेच फायर ब्रिगेडला दिली.
A two-storey building collapsed last night in Bhiwandi, Maharashtra. Due to this, 2 people including 1 child died, while 5 people were injured. People nearby immediately informed the police and administration about the accident. The police team reached after the @mybmc pic.twitter.com/rIKThiEl96
— Bharat Ghandat (@GhandatMangal) September 3, 2023
दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी फायर ब्रिगेड आणि महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. टीमने मलब्याआखील दबलेल्या लोकांना काढायला सुरूवात केली. बऱ्याच प्रयत्नानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश आले. या दरम्यान, दोन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
खूप जुनी होती इमारत
ही इमारत खूप जुनी होती अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ही इमारत खाली कऱण्याचे आदेश दिले गेले होते की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. बचावकार्य पूर्ण झाले असून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.