Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजPanchamahabhuta : पंचतत्त्वांचे संतुलन मोलाचे

Panchamahabhuta : पंचतत्त्वांचे संतुलन मोलाचे

  • निसर्गवेध : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

जर पंचमहाभुतांचे नैसर्गिक संतुलन बिघडले, तर या जीवसृष्टीचा विनाश होऊ शकतो, हे पूर्णपणे आपल्या ऋषीमुनींना माहीत होतं. म्हणूनच हिंदू धर्माप्रमाणे पृथ्वीवरील पंचमहाभुतांना सुदृढ करणारे सर्व नैसर्गिक घटक उदाहरणार्थ डोंगर, नद्या, औषधी वनस्पती, खनिजे यांना देवी-देवतांची नावे देऊन त्यांना पूजनीय स्थान दिले आहे.

भारतातील आणि जगातील अनेक ठिकाणी अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि त्याचा दोष हा सरकार आणि निसर्गाचा कोप याला आपण देत आहोत. खरं तर पावसामुळे समुद्राच्या हालचालींना वेग येतो. जलस्तर वाढतो. भूगर्भातील हालचालींचे प्रमाण हे खूप प्रमाणात वाढते. त्यामुळे फ्लोटिंग लँडवर नैसर्गिक प्रक्रियेनुसार भूकंप, दरडी कोसळणे, पूर येणे, भूस्खलन होणे या घटना होणे नैसर्गिक आहे. महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिकरीत्या पाण्याचा निचरा न होणे, जमिनीत पाणी न मुरणे, मानवाने प्रगतीच्या नावाखाली राबविण्यात आलेले प्रगती प्रकल्प, रासायनिक खते आणि चुकीच्या ठिकाणी केलेले वास्तव्य ही या नैसर्गिक आपत्तींची मूळ कारणे आहेत.

मानव आपल्या प्रगतीसाठी डोंगर फोडून तिथे प्रगती प्रकल्प आणि वास्तव्य करीत आहे. खरं तर मानव निसर्गाच्या सर्व संरचना नष्ट करत आहेत. पंचतत्त्वांचे संतुलन बिघडवत आहे. प्रगतीच्या नावावर अधोगती करत आहे.

भारतीय ऋषिमुनी हे खरं तर शास्त्रज्ञ होते. त्यांनी अध्यात्म आणि शास्त्र यांच्या संगमाने अनेक ग्रंथ लिहिलेत. हिंदू धर्म, संस्कार आणि संस्कृती ही पूर्णपणे शास्त्रीयदृष्ट्या आहे, जी अध्यात्मामध्ये गुंफून समाजापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. जर आपण आपले पौराणिक ग्रंथ, मंत्र, वेद यात पाहिले, तर संपूर्णपणे या पृथ्वीचे, जीवसृष्टीचे संरक्षण आणि संवर्धन कसे करावे आणि सुखी आयुष्य कसे जगावे या संदर्भात पूर्णपणे समाजाला जागृत केले आहे. जर या पंचमहाभुतांचे नैसर्गिक संतुलन बिघडले, तर या जीवसृष्टीचा विनाश होऊ शकतो हे पूर्णपणे आपल्या ऋषीमुनींना माहीत होतं म्हणूनच हिंदू धर्माप्रमाणे पृथ्वीवरील असणारे पंचमहाभुतांना सुदृढ करणारे सर्व नैसर्गिक घटक उदाहरणार्थ डोंगर, नद्या, औषधी वनस्पती, खनिजे यांना देवी-देवतांची नावे देऊन त्यांना पूजनीय स्थान दिले आहे.

प्रत्येक नैसर्गिक घटकांचा रंग-रूप, आकार हे सर्व शास्त्रीयदृष्ट्या जीवसृष्टीसाठी पूरक असे आहे, हे गहन अभ्यासानंतर आपल्याला समजून येते. आपले पुराणग्रंथ हे श्रेष्ठ आहेत. निसर्ग ही देवता असून तिच्याशी जवळीक निर्माण होणे आवश्यक आहे. जर एकाही घटकाला कमकुवत केले, तर या जीवसृष्टीचा आत्मघात होईल, ही जीवसृष्टी नामशेष होईल म्हणून तिचे संवर्धन आणि संरक्षण करणे आवश्यक आहे.

एक घटक पर्वत हे पृथ्वी मातेला ऊर्जा देतात आणि तिचे अस्तित्व टिकवून ठेवतात. म्हणूनच पर्वतांवर सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण अशी धार्मिक स्थळे आहेत. पर्वतांच्या जवळ राहा कारण तेथे नद्या वाहतात, शुद्ध हवा असते; परंतु पर्वताला स्पर्शही करू नका असे पुराणांमध्ये सांगितलेलेच आहे.
अनेक वेदांमध्ये या पंचतत्त्वांचे महत्त्व दिले आहे. पर्वत आपली ऊर्जा सूर्याच्या किरणांप्रमाणे पृथ्वीवर पसरवतात म्हणून आपण सुरक्षित आहोत. पर्वत खणन केल्यामुळे पूर्णपणे औषधी वनस्पती, पशू-पक्षी, कीटक आणि पंचतत्त्व यांची नैसर्गिक साखळी तुटत जाते.

मानव सोडून या सृष्टीतील प्रत्येक घटक हा निसर्गाच्या संवर्धनाचे आणि संरक्षणाचे कार्य करीत असतो. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीचे कारण हे फक्त मानवच आहेत. आपण आपल्या प्रगतीची दिशा आणि त्याची व्याख्या बदलली पाहिजे. यावर एकच उपाय आहे सरकारने कडक कायदे करून नैसर्गिक संरचनांना संरक्षण द्यावे. कोणत्याही परिस्थितीत पर्वतांवर वास्तव्याच्या परवानग्या देऊ नये.

आपल्यालासुद्धा निसर्गातील इतर जीवसृष्टीप्रमाणे निसर्ग नियमानुसार जगायला पाहिजे. आपल्याला निसर्ग ऑक्सिजनपासून ते औषधापर्यंत, अन्न, वस्त्र, निवारा सर्व काही देत असतो. त्याचे आपण सतत आभार मानले पाहिजे आणि याच गोष्टी वेदांमध्ये आहेत. अथर्ववेदातील पृथ्वी सूक्त आणि भूमिसूक्त यात याचे वर्णन आहे. निसर्गदेवता आणि निसर्ग नियम, वैदिक शास्त्र हे सर्व वेदांमध्ये आपल्याला मिळते. प्रगतीच्या नावाखाली आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. आपल्याला खऱ्या अर्थाने जर सुवर्णयुग आणायचे असेल, तर भारतीय पौराणिक ग्रंथ, मंत्र आणि वेद यांचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे.

या पृथ्वीच्या बाह्य सौंदर्याचा नाही तर आंतरिक सौंदर्याचा विचार करायला पाहिजे. आपल्या चुकांची शिक्षा आपण निसर्गाला देत आहोत. आपण निसर्गाचे रक्षण केले, तरच आपले रक्षण होईल.

यजुर्वेदातील एका पर्यावरण मंत्राचा अर्थ :
“जल शांती देतात, औषधी वनस्पती वनस्पती शांती देतात, नैसर्गिक शक्ती म्हणजेच विश्वदेव शांती देतात, सर्वत्र शांती नांदो, शांती आम्हाला शांती देवो, शांती ही एक देवता आहे.” देवांनी पूजलेली रक्षण केलेली ही भूमी आम्हाला मध प्रदान करो म्हणजेच अमृतासारखा गोडवा या भूमीत राहो.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -