नवी दिल्ली : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावलेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना दिल्लीतील (New Delhi) सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आलं आहे. तापाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ रुग्णालयात आणण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
सोनिया गांधी यांच्यावर यापूर्वी मार्चमध्ये दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांना ताप येत होता. त्यानंतर त्या बऱ्या होऊन घरी परतल्या होत्या. मात्र आता पुन्हा त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra