
नवी दिल्ली : Chandrayaan-3बाबत मोठे अपडेट समोर आले आहे. इस्त्रोने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला १४-१५ दिवसांसाठी झोपवले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत इस्त्रोने सांगितले की रोव्हरने आपले काम पूर्ण केले आहे. त्याला सुरक्षित ठिकाणी पार्क करून स्लीप मोडमध्ये सेट केले आहे. APXS आणि LIBS पेलोड सध्या बंद आहे. या पेलोडच्या मदतीने डेटा लँडरच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवला जातो.
आपल्या पोस्टमध्ये इस्त्रोने पुढे लिहिले की सध्या बॅटरी पूर्णपणे चार्ज आहे. रिसीव्हर चालू ठेवण्यात आला आहे. आशा आहे की रोव्हर आपल्या असाईंनमेंटचा दुसरा भाग पूर्ण करण्यासाठी पुन्हा झोपेतून उठेल. जर असे झाले नाही तर तो चंद्रावर भारताचा चंद्र राजदूत म्हणून उपस्थित असेल.
चंद्रावर ५-६ तारखेपर्यंत अंधार पसरेल. सूर्य मावळणार आहे. त्यानंतर लँडर आणि रोव्हर पुढील १४-१५ दिवस अंधारात असतील. म्हणजेच चंद्राची रात्र सुरू होणार आहे. चंद्रयान ३ २३ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले होते. त्यावेळेस तेथे सूर्य उगवला होता.
Chandrayaan-3 Mission:
The Rover completed its assignments.
It is now safely parked and set into Sleep mode.
APXS and LIBS payloads are turned off.
Data from these payloads is transmitted to the Earth via the Lander.
Currently, the battery is fully charged.
The solar panel is…
— ISRO (@isro) September 2, 2023
इस्त्रोची प्लानिंग होती की चंद्राच्या ज्या भागावर लँडर रोव्हर उतरतील तेथे पुढील १४ ते १५ दिवस सूर्याचा प्रकाश पडत राहील. म्हणजेच तिथे दिवस आहे. पुढील चार दिवस आणखी राहील. त्यानंतर अंधार होऊ लागेल. सूर्याची किरणे लँडर-रोव्हरवर पडणार नाहीत. यासाठी बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यानंतरच सिस्टीम बंद करण्यात आली आहे. म्हणजेच गरज पडल्यावर त्यांना पुन्हा सुरू करता येईल.