Monday, June 30, 2025

Asia Cup 2023: पावसामुळे भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला बंपर फायदा

Asia Cup 2023: पावसामुळे भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला बंपर फायदा

पल्लेकल: क्रिकेट चाहत्यांना ज्या सामन्याची आतुरतेने प्रतीक्षा होती त्या सामन्यात पावसाने खोडा घातला. भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) या महामुकाबल्यात पावसाने गोंधळ घातल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला. ३ सप्टेंबरला हा सामना खेळवण्यात आला मात्र तो अर्धवटच.


मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द झाला. सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि बाबरच्या संघाला फलंदाजी करता आली नाही.






 

हा सामना रद्द झाल्याचा सगळ्यात मोठा फायदा पाकिस्तान संघाला झाला आहे. ते सुपर ४मध्ये पोहोचले आहेत. या आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये पोहोचणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळला २३८ धावांनी हरवले होते.


भारत आणि पाकिस्तान दोघेही आशिया चषकाच्या ग्रुप एमध्ये आहेत. तिसरा संघ नेपाळही आहे. ग्रुप सामन्यात पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला हरवले होते. आता बाबरच्या संघाचा दुसरा सामना भारताविरुद्ध होता त्यात पावसाने व्यत्यय आणला. अशातच भारत आणि पाकिस्तान संघाला १-१ गुण देण्यात आला. या पद्धतीने पाकिस्तान ३ गुणांसह सुपर ४मध्ये पोहोचले आहेत.



भारतीय संघासाठी करो वा मरो


आता भारतीय संघाला आशिया चषकात दुसरा सामना नेपाळविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना ४ सप्टेंबरला पल्लेकल येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास ते सुपर ४मध्येतील. हरल्यास नेपाळ बाहेर जाईल.

Comments
Add Comment