
नवी दिल्ली : आशिया चषक (asia cup 2023) सुरू असतानाच मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेवर पावसाचे सावट आहे. रिपोर्ट्सनुसार कोलंबो येथील आशिया चषकातील सामने दुसऱ्या स्टेडियवर शिफ्ट होण्याची शक्यता आहे. कारण येणाऱ्या आठवड्यांमध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषद कोलंबो येथील सामने वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या विचारात आहे.
आशिया चषक २०२३चे बदलणार वेळापत्रक
कोलंबोत मुसळधार पावसामुळे तेथे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. या ठिकाणी स्पर्धेचे नॉकआऊठ फेरीचे सामने हआहेत. कोलंबोकडे आशिया चषक २०२३मधील सुपर ४चे सामने आणि फायनलचे सामने रंगणार होते. कोलंबोला ९, १०, १२, १४ आणि १५ सप्टेंबरला प्रेमदासा स्टेडियममध्ये हे सुपर ४मधील सामने रंगणार होते. तर फायनलचा सामना १७ सप्टेंबरला रंगणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यावरही संकट
सुपर ४ मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मात्र तो सामनाही रद्द होण्याची शक्यता आहे. कारण पुढील आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हा सामनाही कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार ७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
स्पर्धेचा तिसरा सामना झाला रद्द
याआधी शनिवारीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी केली. मात्र बाबरच्या संघाला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एकएक गुण देण्यात आला.