Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाAsia cup 2023: बांगलादेशचा अफगाणिस्तानवर ८९ धावांनी दमदार विजय

Asia cup 2023: बांगलादेशचा अफगाणिस्तानवर ८९ धावांनी दमदार विजय

लाहोर: श्रीलंकेकडून पराभव स्वीकारल्यानंतर बांगलादेशने आशिया चषक २०२३ (asia cup 2023) स्पर्धेत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. बांगलादेशने (bangladesh) अफगाणिस्तानला (afganistan) ८९ धावांनी हरवले. बांगलादेशने ५० षटकांत पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद ३३४ धावा केल्या होत्या. मात्र अफगाणिस्तानला केवळ १० बाद २४५ धावा करता आल्या.

बांगलादेशकडून मेहिदी हसन मिराजने याने जबरदस्त ११२ धावांची खेळी केली .तर नजमुल हौसेन शांतोने १०४ धावा फटकावल्या. या दोघांनी जबरदस्त भागीदारी साकारल्याने बांगलादेशच्या संघाला तीनशे पार धावांचा टप्पा गाठता आला.

मिराजने ११९ चेंडीत ११२ धावा ठोकल्या. यात त्याने ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तो दुखापतग्रस्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. तर दुसरीकडे तौहित हृदोय खाते न खोलताच बाद झाला. त्यानंतर नजमुलने मेहिदी हसनला चांगली साथ दिली. त्याने १०५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह १०४ धावा ठोकल्या.

अफगाणिस्ताकडून इब्राहिम झद्रानने ७५ धावांची सर्वाधिक खेळी केली तर कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदीने ५१ धावा केल्या. बाकी इतर कोणत्याही फलंदाजांला चांगली कामगिरी करता आली नाही. बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तानला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. त्यांचे सर्व फलंदाद ४४.३ षटकात २४५ धावांवर परतले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -