Raj Thackeray : काल जे घडले त्यात प्रशासनाचीच चूक - राज ठाकरे

या दुर्दैवी घटनेला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार


मुंबई : काल जे घडले त्यात प्रशासनाची चूकच आहे. पण ते ज्या कारणांनी घडले त्याला गेल्या वीस वर्षात महाराष्ट्राचे विस्कटलेले राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले आहे.


यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणे आणि ते पाडून दुसरे सरकार आणणे यातून जे काही शौर्य दाखवण्याची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल, असे आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.





राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे यांनी लाठीमाराचा निषेध व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.


या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेऊन आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली त्या आंदोलनांचा इतिहास बघितला तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हटलं तसं की ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा जगाने आदर्श घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की पूर्व इतिहास पाहता आंदोलकांनी कोणतच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे येथे सरकारचं चुकलं हे निश्चित, असे राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.


राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा, तर या दुर्दैवी घटनेला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का?, ते न्यायालयात टिकेल का?, बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घोडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल? यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?, इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाही तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं, असे राज ठाकरे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून

BMC News : मुंबईत १,१२४ दुकानांना मराठीतील फलकांची ऍलर्जी

महिनाभरात ३५ हजारांहून अधिक दुकानांच्या तपासणीतून झाले उघड मुंबई : मराठी भाषेतील नामफलक सक्तीच्या

BMC : महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

स्थायी समिती सदस्याने केली विचारणा समितीपुढे माहिती सादर करण्याची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Artificial intelligence (AI) : एआयने शोधली कंत्राटदारांची हातचलाखी

नालेसफाई कामांमध्ये कंपन्यांना ९.२५ कोटी रुपयांचा दंड मुंबई : नाले स्वच्छतेच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची