Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीMalnutrition problem in Melghat : मेळघाटात कुपोषणाचा प्रश्न ‘जैसे थे’

Malnutrition problem in Melghat : मेळघाटात कुपोषणाचा प्रश्न ‘जैसे थे’

दासबर्ग क्लिनिक प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यातून स्पष्ट

मुंबई : मेळघाट आदिवासी पट्ट्यात बालक आणि माता यांच्यातील कुपोषणाचा प्रश्न (Malnutrition problem in Melghat) ऐरणीवर आला आहे. शासनाच्या सर्व योजना त्या ठिकाणी कार्यन्वित असून देखील कुपोषणाचा प्रश्न सुटत नाही. आजही येथील आदिवासी पाड्यांवरील नवजात बालके सॅम तसेच मॅमच्या वर्गवारीत मोडत आहेत, तर नवविवाहिता वेळेआधीच माता होत असल्याने त्या देखील कुपोषित असतात. यामुळे नवजात बालकांना पोषण आहार मिळत नाही. येथील नवजात बालके तसेच माता यांच्या कुपोषणामागे दडलेल्या कारणांचा शोध दासबर्ग क्लिनिककडून शोधण्यात आली. या क्लिनिकच्या अभ्यासानुसार शासन सर्व प्रकारचे अन्न, कपडे, औषधी पुरवत असले तरी सरकारी मार्गदर्शक तत्वांचे स्वीकृतीचा अभाव असून येथील आदिवासी अजूनही रुढी परंपराच्या काही गैरसमजांमुळे सर्वच आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास कचरत असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले.

दरम्यान दासबर्ग क्लिनिककडून यावर प्रतिबंधात्मक कार्यक्रमही आखला असल्याचे सांगण्यात आले. या क्लिनिकचे डॉ. सुनील लांबे, डॉ. दिनक जैन, समाजसेवक गणेश लंबे, कमलेश यादव, जी. मुदलियार या टीमने मेळघाटात ग्राऊंड झिरो अहवाल सादर केला आहे. याला टेंब्रू सोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंपळकर व आदिवासी भागातील समाजसेवक बंड्या साने यांचे मार्गदर्शन लाभले. नुकतेच २६ ऑगस्ट २०२३ रोजी आदिवासी भागाला भेट देण्यात आली. येथील आदिवासी पाड्यांवर फिरून सरकारी सुविधांची स्थिती पाहिली. मात्र सरकारी योजना उत्तमरित्या राबवित असल्याचे दिसून आले. तरीही बालक आणि नवमातांमधील कुपोषणाचा प्रश्न दिसून येत असल्याचे दासबर्गचे डॉ. सुनील लांबे यांनी सांगितले. या ठिकाणी मुलींची लग्न वेळेआधी होत असल्याने लग्नानंतर नको त्या वयातच नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते. हा गर्भधारणेचा दर मुलांची काळजी घेण्याच्या क्षमतेपेक्षा थोडा अधिकच आहे. हाच कळीचा मुद्दा असून यावर काम करण्याची गरज असल्याचे डॉ. लांबे यांनी स्पष्ट केले.

उपाययोजना…

या औषधांमुळे सर्व काही पचवण्याची तयारी, प्रत्येक माता आणि अर्भक केवळ होमिओपॅथी औषधांनीच शक्य होऊ शकते, असे सांगत या कुपोषणावर उपाय सांगत यातून शासनाची उद्दिष्ट आणि ध्येय गाठली जाऊ शकतात. काही मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केल्यास वर्ष दोन वर्षात कुपोषणाचे समूळ उच्चाटन होऊ शकते, असे दासबर्ग क्लिनिकच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. हे औषध इम्यून बुस्टरच काम करत असून बालकांमधील उलटी, जुलाब, सर्दी, खोकला न्युमोनियासारख्या सतत होणाÚऱ्या आजारांवर उपाय ठरू शकतो. यातून प्रतिकार क्षमता वाढते. आजरपण गेल्याने त्यांचे पोषणक्षमता वाढू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -