
जालना पोलिसांच्या कृतीवर नितेश राणे यांचा तीव्र संताप
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गेल्या चार दिवसांपासून उपोषण (Jalna Maratha Reservation Protest) करत आहेत. याला विरोध करत आज पोलिसांनी आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यावेळी आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मराठा उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध केला आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अशा अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असा सरकारला इशारा दिला आहे, तर सातत्याने दंगली होणार अशी वक्तव्ये करणार्या उबाठा गटाच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत (Sanjay Raut) यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
नितेश राणे यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जालना जिल्ह्यात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला त्या पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध आहे. राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात निघणारे हिंदू मोर्चे (Hindu Protests) हे काँग्रेस आणि विरोधकांचे खरे दुखणे आहे. लव जिहाद, लँड जिहाद सारखे मुद्दे यांना अडचणीचे आहेत. कारण हे ज्या जिहादी लोकांना पोसतात तेच अडचणीच यायला लागले आहेत. हिंदू सामाज जागा होतो आहे आणि ते यांना परवडणारे नाही. म्हणून हिंदू समाजाला जाती-जाती मध्ये झुंजवत ठेवायचे आणि आपल्या जिहादी बापांना खुश ठेवायचे हाच खरा कार्यक्रम आहे! अशी जोरदार टीका नितेश राणे यांनी केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात निघणारे हिंदू मोर्चे हे काँग्रेस आणि विरोधकांचे खरे दुखणे आहे..
लव जिहाद, लँड जिहाद सारखे मुद्दे यांना अडचणीचे आहेत.. कारण हे ज्या जिहादी लोकांना पोसतात तेच अडचणीच यायला लागले आहे..
हिंदू सामाज जागा होतो आहे आणि ते यांना परवडणारे नाही..
म्हणुन…
— nitesh rane (@NiteshNRane) September 2, 2023
मराठा समाजाच्या माझ्या बांधवांनी हा डाव वेळीच ओळखावा
मराठा आरक्षण हे राणे समितीच्या अहवाला मुळे मिळालं आणि ते आरक्षण फडणवीस साहेबांनी टिकवून दाखवलं. पण विरोधकांना मराठा आरक्षणाबद्दल काही देणंघेणं नाही. सत्तेत असताना यांनी आरक्षणाच्या केसची वाट लावली. समाजाला ही माहीत आहे, आरक्षण परत आमचंच सरकार देणार. शांत आंदोलन होत असताना पोलिसांवर दगड कोणी मारायला लावले? मविआच्या नेत्यांची खरी चिंता मराठा आरक्षण पेक्षा राज्यात निघणाऱ्या “हिंदू जनआक्रोश मोर्चाची” आहे. हिंदू समाजाला आपसात लढवत ठेवायचे! मराठा समाजाच्या माझ्या बांधवांनी हा डाव वेळीच ओळखावा. हीच विनंती!
हीच का ती दंगल?
काल रात्री छत्रपती संभाजीनगरला कुठल्या उबाठा नेत्याच्या जवळच्या लोकांनी गाड्या जाळल्या? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सतत राज्यात दंगली होणार हे सांगत होते, मग हीच ती दंगल होती का? अशा शब्दांत नितेश राणे यांनी उबाठा गटाचा समाचार घेतला आहे.
काय आहेत नेटकर्यांच्या प्रतिक्रिया?
विकास पवार या एका नेटकर्याने देखील या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नितेश राणे यांच्या ट्वीटला रिप्लाय करत त्याने निहिले आहे की, पोलिसांवर दगडफेक करून गंभीर जखमी करणारे मराठे असू शकत नाहीत. ५८ मोर्चे शांततेत काढणारा माझा मराठा समाज असे कृत्य करणार नाही. हे कोणी घडवून आणलं? आंदोलनात समाज कंटक कोणी घुसवले आहेत? पोलीस प्रत्येक समाजकंटकाला घरातून शोधून काढणार, मराठा समाजाला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल.
पोलिसांवर दगडफेक करून गंभीर जखमी करणारे मराठे असू शकत नाहीत..
58 मोर्चे शांततेत काढणारा माझा मराठा समाज असे कृत्य करणार नाही..
हे कोणी घडवून आणल? आंदोलनात समाज कंटक कोणी घुसवले आहेत?
Sharad Pawar , uddhav thackeray, Supriya Sule तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल. pic.twitter.com/61VdnWSut2
— vikas pawar (@vikaspawar5) September 2, 2023