Thursday, June 12, 2025

India vs Pakistan: चाहत्यांची निराशा, पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द

India vs Pakistan: चाहत्यांची निराशा, पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द

पल्लेकल: आशिया चषकातील (asia cup 2023) ज्या सामन्याची चाहते इतक्या आतुरतेने वाट पाहत होते त्याने मात्र चाहत्यांची साफ निराशा केली. भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे चाहते मात्र चांगलेच हिरमुसले आहेत.


भारताने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर संपूर्ण संघाला केवळ २६६ धावा करता आल्या. इशान किशनने ८१ चेंडूत ८२ धावा केल्या तर हार्दिक पांड्याने ९० चेंडूत ८७ धावांची खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. दरम्यान, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा(११), विराट कोहली(४), शुभमन गिल(१०) आणि श्रेयस अय्यर (१४) स्वस्तात बाद झाले.


 


या सामन्यात पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रऊफ यांचीच जादू पाहायला मिळाली. आफ्रिदीने ३१ धावा देत ४ विकेट घेतल्या तर हारिसने ५३ धावा देत ३ विकेट मिळवल्या.



पुढील सामना नेपाळविरुद्ध


भारताचा पुढील सामना नेपाळविरुद्ध रंगणार आहे. ४ सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे. याआधी नेपाळचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात नेपाळला पाकिस्तानविरुद्ध २३८ धावांनी पराभव सहन करावा लागला होता.



पाकिस्तानचा सुपर ४मध्ये प्रवेश


पावसामुळे भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला आहे. दोन्ही संघांना एकएक गुण देण्यात आला आहे. यासोबतच तीन गुणांसह पाकिस्तानचा संघ सुपर ४मध्ये पोहोचला आहे. अशातच सुपर ४मध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. त्यानंतर सुपर ४मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात टक्कर होईल
Comments
Add Comment