राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी घेतली दखल
महेश साळुंके,लासलगाव : कोबी बियाण्यात शेतकऱ्याची फसवणूक झाल्याबाबत दै. प्रहार मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेवुन मंत्री छगन भुजबळ यांनी बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि गुन्हाही नोंदविण्यात आला.
आज सायंकाळी ४-५ वाजेच्या दरम्यान नागरे आणि कुटे परिवाराची राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांची येवला येथील कार्यालयामध्ये भेट घङवुन आणण्यात आली.तक्रारदार शेतकऱ्यांनी आपबिती कथन केली. भुजबळ यांनी तरुण शेतकऱ्याची झालेल्या फसवणूकीची तात्काळ दखल घेऊल लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना तात्काळ कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यास आदेशीत केले.
त्याप्रमाणे रात्री उशिरा कंपनीच्या विरोधात भा.द,वि कलम ४२० ,३४ अन्वये फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे