Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Second Marriage: या अभिनेत्याच्या आईने केलं दुसरं लग्न

Second Marriage: या अभिनेत्याच्या आईने केलं दुसरं लग्न

मुंबई: मराठी सिनेइंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (siddharth chandekar) साऱ्यांनाच अभिमान वाटेल अशी एक गोष्ट केली आहे. जी गोष्ट केवळ आपण बोलून दाखवू शकतो ती त्याने आपल्या प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे. सिद्धार्थने आपल्या आईचे म्हणजेच सीमा चांदेकर यांचे दुसरे लग्न (second marriage) लावून दिले आहे.


असे करून सिद्धार्थने आपल्यासमोर एक मोठे उदाहरण ठेवले आहे. प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात एक जोडीदार हवा असतो आपली सुखदु:खे शेअर करण्यासाठी, सहवासात राहण्यासाठी. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थच्या आईने एकटीने सिद्धार्थचा सांभाळ केला. सिद्धार्थने मराठी इंडस्ट्रीत आपला जम बसवला. त्यानंतर त्याने मिताली मयेकर हिच्याशी लग्नगाठ बांधली.


आपल्या आईच्याही आयुष्यात तिला समजून घेणारा, जपणारा जोडीदार हवा असे सिद्धार्थ चांदेकरला वाटत होते. नुकताच सिद्धार्थच्या आईचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.


Happy Second Innings आई!
तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं!
I love you आई!
Happy Married Life






असं त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.


दुसरीकडे सिद्धार्थची बायको अभिनेत्री मिताली मयेकरनेही याबबतची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. सासूचं लग्न म्हणून तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सासूला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Add Comment