Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

Asia cup: रोहितसमोर हे मोठे आव्हान, म्हणाला, आमच्यासाठी ही मोठी डोकेदुखी

Asia cup: रोहितसमोर हे मोठे आव्हान, म्हणाला, आमच्यासाठी ही मोठी डोकेदुखी

मुंबई: भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यात होणाऱ्या हायवोल्टेज सामन्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत. अशातच चाहत्यांसोबत टीम इंडियाही आपली तयारी करत आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) मीडियाशी बातचीत केली. यासोबतच त्याने हे ही सांगितले की त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी कोणती आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामन्याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. दोन्ही संघ या महामुकाबल्यासाठी कंबर कसून तयार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सामन्या्च्या एक दिवस आधी मीडियाशी बातचीत केली. तसेच मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने मिडल ऑर्डरमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीबाबत उत्तरे दिली.

रोहित म्हणाला, मधल्या फळीत कोणाला संधी द्यावी आणि कोणाला बाहेर बसवावे हीच आमच्यासाठी मोठी डोकेदुखी आहे. कारण संघात जितके खेळाडू आहेत तितके दमदार आहेत. अशातच कोणा एकाची प्लेईंग ११मध्ये निवड करणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट

२ सप्टेंबरला शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा सामना खेळवला जाणार आहे. श्रीलंका येथील कँडी येथे हा सामना होणार आहे. सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने ९१ टक्के पाऊस होईळ अशी शक्यता व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा