Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकपाय घसरून धरणात पडल्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

पाय घसरून धरणात पडल्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

सिडको : कश्यपी धरणावर फिरत असताना पाय घसरून पडल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हरसुल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशांत रामदास शेंडे (वय ४९) असे या अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रशांत रामदास शेंडें (वय ४९) हौसाई अपार्टमेंट. वृंदावन कॉलनी. खोडे मळा जुने सिडको जवळ, सिडको हे मित्रा समवेत शुक्रवारी सकाळी ११ वाजता कश्यपी धरणावर गेले. या वेळी परिसरातील हॉटेल वर जेवण केले. नंतर धरणावर पाण्याकडे गेले. या वेळी त्यांचा पाय घसरल्याने पाण्यात पडले. या वेळी परिसरातील हॉटेल चालक शंकर पांगरे सह पाच ते सहा जणांनी पाण्यात उडी मारून त्यांना पाण्याबाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच हरसुल पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर शेंडे यांना नाशकातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांच्या तोंडात व नाकात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी हरसुल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शेंडे यांच्या पश्चात आई. वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. मयत शेंडे हे एमएसईबी वितरण कंपनीच्या पंचवटी म्हसरुळ येथील कार्यालयात ऑपरेटर होते. ते महाराष्ट्र राज्य वीज अधिकारी व कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -