
मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीचा (INDIA Alliance Meeting) आज दुसरा आणि अखेरचा दिवस असताना राहुल गांधी अखेरचे सत्र सुरू होण्याआधीच हॉटेलमधून बाहेर पडले. ते कुठे गेले? कोणत्या कामासाठी गेले? हे कुणालाही माहिती नव्हते. तसेच ते इंडिया आघाडीच्या बैठकीतून अचानक असे निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण देखील आले होते. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा हॉटेलमध्ये आल्याने आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.
ब-याच गदारोळानंतर ते माहिममधील बनाजी क्लिनिकला गेले असल्याचे समोर आले. ते डोळे तपासायला गेले असल्याचे देखील सांगण्यात आले. त्याचबरोबर ते गावदेवीला देखील गेले असल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने राहुल गांधी पुन्हा हॉटेलवर परत देखील आले. मात्र यामागे काहीतरी नाराजीचा सूर असावा, असा तर्क आता लावण्यात येत आहे.