Monday, July 8, 2024
Homeक्रीडाIND Vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानच्या प्लेईंग- ११ची घोषणा

IND Vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानच्या प्लेईंग- ११ची घोषणा

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) टीम इंडिया (team india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील २ सप्टेंबरला जबरदस्त ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. हा सामना पल्लेकल येथे भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजल्यापासून खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने या सामन्यासाठी त्यांच्या प्लेईंग ११ची घोषणा केली आहे. पाकिस्तानने त्या खेळाडूंना प्लेईंग ११मध्ये संधी दिली आहे ज्यांनी नेपाळच्या सुरूवातीच्या सामन्यात विजय मिळवून दिला होता.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचे प्लेईंग ११

बाबर आझम(कर्णधार), फखर जमां, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान(विकेटकीपर), शादाब खान(उप कर्णधार), मोहम्मद नवाज, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी

या सामन्याआधीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित म्हणाला, सर्व सहा गोलंदाज चांगले आहेत. त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. खासकरून शमी, सिराज आणि बुमराह. बुमराह दीर्घकाळानंतर पुनरागमन करत आहे. त्याने आयर्लंडमध्ये चांगली कामगिरी केली होती. शमी आणि सिराजही चांगली कामगिरी करत आहेत.

 

रोहित पुढे म्हणाला, येथे कोणतीही फिटनेस टेस्ट नाही. आशिया चषक ६ संधांमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आहे. फिटनेस टेस्ट आणि कॅम्प बंगळुरूमध्ये झाला आहे. आम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल आणि त्या आव्हानांचा सामना करताना काय मिळवू शकतो हे पाहावे लागेल.

कशी असणार भारताची प्लेईंग ११

भारताची प्लेईंग ११ बाबतची माहिती टॉसच्या वेळेसच समजेल. भारत तीन वेगवान गोलंदाज, दोन ऑलराऊंडर, एक स्पिनर आणि पाच फलंदाजांसह या सामन्यात उतरू शकतो.

पाकिस्तानविरुद्ध भारताचे संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -