Monday, October 27, 2025
Happy Diwali

Chandrayan 3: चंद्रावर आला भूकंप?, इस्त्रोने रेकॉर्ड केल्या भूकंपासारख्या हालचाली

Chandrayan 3: चंद्रावर आला भूकंप?, इस्त्रोने रेकॉर्ड केल्या भूकंपासारख्या हालचाली

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (isro) गुरूवारी सांगितले की त्यांनी चंद्रावर आलेल्या नैसर्गिक भूकंपाच्या हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. या हालचाली आयएलएस या पे्लोडने टिपल्या आहेत. इस्त्रोने सांगितले की चांद्रयान ३चा (chandrayaan 3) लँडर विक्रम जो चंद्राच्या पृष्ठभागावर काम करत आहे त्याने चंद्रावर भूकंपाचे कंपन रेकॉर्ड केले आहे. याबाबत प्रज्ञान रोव्हर आणि अन्य पेलोडनेही डेटा पाठवला आहे आणि आता घटनेबाबत तपास सुरू आहे.

चंद्रावर पहिला मायक्रो मेकॅनिकल सिस्टम औद्योगिक आधारित उपकरणाने रोव्हरच्या हालचाली रेकॉर्ड केल्या. इस्त्रोने सांगितले आयएलएसएल पेलोडने ही घटना रेकॉर्ड केलू असून जी नैसर्गिक आहे. विक्रम लँडरद्वारे आलेल्या माहितीनुसार ही चंद्रावरील भूकंपाच्या शक्यतेचे संकेत देतात. मात्र याबाबतचा अभ्यास चालू आहे.

चांद्रयान ३च्या यशाचे अपडेट

चांद्रयान ३ चांगल्या पद्धतीने काम करत आहे. चांद्रयान ३ चंद्रावर पोहोचून १० दिवस झाले आहेत. या आठवड्याभराच्या कालावधीदरम्यान चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारची माहिती सादर केली आहे. यात प्रामुख्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारता पहिला देश आहे.

काय सापडले चंद्रावर

इस्त्रोने ग्राफच्या माध्यमातून चंद्रावर आढळलेल्या तत्वांबाबत सांगितले आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम, सल्फर, कॅल्शियम, आर्यन, क्रोमियम आणि टायटेनियम असल्याचे आढळले आहे. तसेच मँगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याचेही आढळले आहे. तेथे हायड्रोजन आहे का याचाही शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment