Thursday, September 18, 2025

Aisa Cup 2023: पाकिस्तानवर भारी पडणार टीम इंडिया! हा आहे रेकॉर्ड

Aisa Cup 2023: पाकिस्तानवर भारी पडणार टीम इंडिया! हा आहे रेकॉर्ड

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३मध्ये  (asia cup 2023) उद्या म्हणजेच शनिवारी भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याची सारेच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याशिवाय आशिया चषक वेगळ्या अंदाजात होईल कारण यावेळेस एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आशिया चषक खेळवला जातोय.

एकदिवसीय फॉरमॅटबद्दल बोलायचे झाल्यास टीम इंडियासमोर पाकिस्तानचा संघ टिकत नाही. आशिया कप २०२३मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्या आधी जर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या रेकॉर्ड्सवर नजर टाकली तर ते शानदार आहेत.

शेवटच्या १० वनडेमध्ये असा आहे भारताचा रेकॉर्ड

टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या शेवटच्या १० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही वर्ल्डकप २०१९, आशिया चषक २०१८ आणि आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफी २०१७ सारख्या मोठ्या स्पर्धेत एकमेकांसोबत भिडले आहेत. ४ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामना रंगत आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय फॉरमॅटमध्ये २०१९च्या वर्ल्डकपमध्ये समोरासमोर आले होते.

आशिया चषक २०२३मध्ये पाकिस्तानवर भारी पडणार टीम इंडिया!

भारत आणि पाकिस्तानचे संघ शनिवारी आशिया चषक २०२३मध्ये आमनेसामने असतील. हा सामना वर्ल्डकपच्या आधीच्या तयारीचा सामना असेल. यात विराट कोहली, रोहित शर्मा या दिग्गज फलंदाजांचा सामना हारिस रऊफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यासोबत रंगणार आहे.

आशिया चषक २०२३ची स्पर्धा ५० षटकांची होत आहे. त्यामुळे याचा फायदा वर्ल्डकपसाठी नक्कीच होईल. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वर्ल्डकप गहोणार आहे.

Comments
Add Comment