Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीWamanrao Pai : एकोहं बहुस्याम...

Wamanrao Pai : एकोहं बहुस्याम…

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे की, परमेश्वराबद्दलचे अज्ञान जगातील सर्व लोकांमध्ये जे आहे ते जगातील सर्व समस्यांचे मूळ आहे. जगात जेवढ्या समस्या आहेत, जेवढ्या अडचणी आहेत, जेवढा रक्तपात होवून राहिलेला आहे, जेवढे दंगेधोपे घडतात, जेवढ्या अनिष्ट गोष्टी मानवाकडून घडतात त्याला एकमेव कारण म्हणजे परमेश्वराबद्दलचे अज्ञान. काही लोक परमेश्वर आहे म्हणतात, तर काही लोक परमेश्वर नाही म्हणतात. परमेश्वर आहे म्हणणाऱ्यांना परमेश्वर म्हणजे काय ठाऊक नसते, तर परमेश्वर नाही म्हणणाऱ्यांना परमेश्वर काय हे ठाऊक नसते. अशा परिस्थितीत परमेश्वराचे ज्ञान हे सर्वार्थाने, सर्वांगाने, सर्व दृष्टीने, जसा परमेश्वर आहे तसा होणे कधीही शक्य नाही.

पुन्हा सांगतो. परमेश्वर जसा आहे तसा तो कुणाला आकळता येणार नाही, यापूर्वी आलेला नाही, यापुढे येणार नाही. हे का?, तर परमेश्वराला आदी नाही व अंतही नाही. तो अनंत आहे. Infinite आहे, सर्व दृष्टीने Infinite आहे, त्याची निर्मिती Infinite आहे, त्याचे रूप Infinite आहे, त्याचे स्वरूप Infinite आहे, त्याचे ज्ञान Infinite आहे, त्याच्या ठिकाणी असणारा आनंद Infinite आहे, त्याच्याकडून जे निसर्गाचे नियम निर्माण झालेले आहेत ते infinite आहेत. बारकाईने पहिले, तर तुम्हाला असे कळेल की he is Infinite in all respect त्याचा परिणाम म्हणजे परमेश्वर जसा आहे, तसा आकळता येणार नाही. पण तो जो काही थोडाफार अनुभवाला येतो त्यावरून परमेश्वर म्हणजे काय हे कळू शकते. तुम्ही म्हणाल वामनराव तुम्ही हे काय सांगता? मी उदाहरण देवून सांगतो. बायका जेव्हा भात शिजवतात तेव्हा तो शिजला की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक तांदूळ काढून बघण्याची गरज नसते. वरची काही शिते काढून बघितली, तरी संपूर्ण भात शिजला की नाही हे कळते. हे जसे आहे तसे परमेश्वराचे आहे. परमेश्वर जसा आहे तसा आकाळात येणार नाही हे खरेच, तरीसुद्धा परमेश्वराचे रूप स्वरूप कळले की परमेश्वराला आकळता येते.

मघाशी म्हटल्याप्रमाणे भात शिजला की नाही हे दोनचार शितावरून कळते तसे इथे आपल्याला बघता येते. दुसरे उदाहरण देऊन सांगतो. सागर म्हणजे महासागर आहे. तो आपल्या पृथ्वी भोवती आहे. पाण्यांत पृथ्वी आहे असे म्हटले, तरी चालेल. एवढा मोठा सागर आपण पाहू शकतो का? त्याची खोली पाहता येत नाही, त्याची लांबी रुंदी पाहता येत नाही पण समुद्राचे थोडेसे पाणी हातात घेतले व तोंडात टाकले, तरी ते खारट आहे हे कळते, त्याचा रंग निळा आहे, त्याचे वजन आहे, तो प्रवाही आहे हे कळते. असा तऱ्हेने अनेक गोष्टी आपल्याला या थोड्या पाण्यावरून कळतात. यासाठी सगळं समुद्र बघण्याची गरज नाही. तसा तो बघता येणारही नाही. तसे इथे आहे. परमेश्वर कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी सत् आहे, चित् आहे व आनंद आहे. त्यांच्याठिकाणी असणारा हा जो आनंद आहे तो स्फुरद्रूप आहे. आनंद कधीही एके ठिकाणी रहात नाही. तो सतत स्फुरद्रूप असतो.“एकोहं बहुसंयम्.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -