Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीSupreme Court : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला!

Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला!

हल्लेखोरांकडून डमी वेबसाईटद्वारे नागरिकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) वेबसाईटवर सायबर हल्ला (Cyber Attack) करत, हल्लेखोरांकडून नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या सायबर हल्ल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडूनच एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या निवेदनात रजिस्ट्रीच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्याचे नमुद केले आहे. अधिकृत वेबसाईटप्रमाणे दिसणारी एक वेबसाईट तयार करण्यात आली असून, याच्याद्वारे नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सायबर हल्ल्यानंतर नागरिकांनी त्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती अपलोड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती www.spi.gov.in अशी आहे. मात्र, सायबर चोरट्यांनी spi.gv.com अशा युआरएलने फेक वेबसाईट बनवण्यात आली आहे. यावर क्लिक केल्यास लोकांची खासगी आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत वेबसाईटशिवाय कोणत्याही फेक वेबसाईटला बळी पडू नये तसेच तुमचा डेटा चोरीला गेला असेल, तर त्याबाबत तातडीने सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या सुप्रीम कोर्टाची अनेक कामे ही ऑनलाईन होत असून, त्यात अशाप्रकारे सायबर हल्ला झाल्याचे वृत्त धक्कादायक मानले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -