Thursday, May 8, 2025

देशताज्या घडामोडी

Chandrayaan 3: चंद्रावर गोल-गोल फिरतोय प्रज्ञान रोव्हर, लँडरने पाठवला क्यूट व्हिडिओ

Chandrayaan 3: चंद्रावर गोल-गोल फिरतोय प्रज्ञान रोव्हर, लँडरने पाठवला क्यूट व्हिडिओ

नवी दिल्ली : चंद्राच्या पृष्ठभागावर चालत असलेल्या प्रज्ञान रोव्हरचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात तो गोल गोल गिरक्या घेताना दिसत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने प्रज्ञानचे हे गोल फिरणे म्हणजे चांदोबा मामाच्या अंगणात खेळणारे लहान मूल असल्याचे म्हटले आहे. चांद्रयान ३ने २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले.


इस्रोकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर एकाच ठिकाणी गोल गोल फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ विक्रम लँडरच्या इमेजर कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार, सुरक्षित मार्गाच्या शोधात रोव्हर फिरत आहे. त्याचे हे फिरणे विक्रम लँडरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने लिहिले की, हे पाहून असे वाटते की आई बसून बघत आहे आणि बाळ चांदोबा मामाच्या अंगणात खेळत आहे





चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर असल्याचा दावा रोव्हरमधील आणखी एका उपकरणारे केला असल्याची माहिती इस्त्रोने दिली. अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोस्कोपने सल्फरसह अन्य छोटी छोटी तत्वे असल्याचाही शोध लावला आहे.



२३ ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग


भारताचे अत्यंत महत्त्वाचे तसेच महत्त्वाकांक्षी चांद्रयान ३ ने २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. त्यानंतर आतापर्यंत चांद्रयानाच्या लँडर तसेच रोव्हरकडून बहुपयोगी माहिती आपल्याला मिळत आहे.

Comments
Add Comment