Monday, July 15, 2024
Homeक्रीडाAsia cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ विकेट राखून विजय

Asia cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ विकेट राखून विजय

पल्लेकल: आशिया चषक २०२३मधील (asia cup 2023) दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर ५ विकेट राखून विजय मिळवला आहे. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. श्रीलंकेच्या तिखट माऱ्यासमोर बांगलादेशच्या संघाला २०० धावांचा पल्लाही गाठता आला नाही.

त्यानंतर श्रीलंकेने १६५ धावांचे आव्हान ३९ ओव्हरमध्ये ५ विकेट राखत पूर्ण केले. श्रीलंकेच्या चरिथ असलंकाने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर सदिरा समारवीक्रमाने ५४ धावांची खेळी करत संघाला आव्हान पूर्ण करण्यात मदत केली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे पहिले तीन विकेट झटपट गेले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ थोड्या दबावात मात्र श्रीलंकेच्या चरिथ असलंका आणि सदिरा समारवीक्रमाने संयम राखत चांगली भागीदारी रचली आणि संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४२.४ षटकांत सर्वबाद १६४ धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून केवळ एकाच खेळाडूला मोठी खेळी करता आली. बांगलादेशच्या नजमुल हौसेन सांतोने ८९ धावांची खेळी केली. इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही.

याआधीच्या ग्रुप ए मधील पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने नेपाळला चांगलेच धुतले. पाकिस्तानने नेपाळवर २५८ धावांनी विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -