Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीParliament Session : मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेत बोलावलं पाच दिवसांचं विशेष...

Parliament Session : मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेत बोलावलं पाच दिवसांचं विशेष सत्र

नवी दिल्ली : संसदेचं (Parliament) नुकतंच पावसाळी अधिवेशन (Monsoon session) पार पडलेलं असताना काही दिवसांत अचानक पुन्हा पाच दिवसांचं विशेष सत्र (Special Session) बोलावण्यात आलेलं आहे. या विशेष सत्रामध्ये दहापेक्षा जास्त बिलं संसदेत सादर केली जाणार आहेत. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी आज एक्सवर ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे. हे सत्र १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आलेलं आहे.

पावसाळी अधिवेशनानंतर हिवाळी अधिवेशन होते. मात्र त्यापूर्वीच संसदेचे विशेष सत्र घेऊन नेमकी काय विधेयकं मंजूर करण्यात येणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विशेष सत्रात ५ बैठका होणार आहेत. दरम्यान, या विधेयकांबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.

संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत चाललं होतं. यादरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात उत्तर द्यावं यासाठी विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. अखेर मोदींनी सभागृहात मणिपूर हिंसाचारावर उत्तर दिलं, तसेच त्यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावरही हल्ला चढवला होता. त्यानंतर आता या विशेष सत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -