मुंबई: ऱक्षाबंधनाचा सण हा हिंदू परंपरेतील महत्त्वाचा सण मानला जातो. बहीण-भावाचे प्रेम जपणारा असा हा सण आहे. दरवर्षी रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमा तिथीला साजरा केला होता. काही लोकांचे म्हणणे आहे ३० ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण दिवस भद्रा राहणार आहे त्यामुळे ३१ ऑगस्टला राखी बांधली जाऊ शकते. तर ज्योतिषांच्या मते ३० ऑगस्टला भद्रा असतानाही राखी बांधता येऊ शकते.
३० ऑगस्टला भद्रेची छाया
यावेळेस ३० ऑगस्टला भद्रेची छाया असणार आहे. शास्त्रांनुसार श्रावण महिन्यातील पोर्णिमा तिथीला दुपारी राखी बांधली पाहिजे मात्र दुपारी भद्रकाल असल्याने त्यावेळेस राखी बांधू नये. यावेळेस भद्रा ३० ऑगस्टला पोर्णमा तिथी सुरू होण्यासोबतच १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत आहे. ३० ऑगस्ट म्हणजेच रात्री ९ वाजून २ मिनिटांपर्यंत भद्रकाल राहणार आहे.
हा आहे राखी बांधण्याचा मुहूर्त
जर तुम्हाला ३० ऑगस्टला राखी बांधायची आहे तर केवळ रात्री ९ वाजून २ मिनिटांनी बांधू शकता. ज्यांना काही कारणामुळे ३० ऑगस्टला राखी बांधता येणार नाही ते लोक ३१ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत राखी बांधू शकतात.
रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे काम
सगळ्यात आधी भावाला पूर्व अथवा उत्तरेच्या दिशेला तोंड करून बसवा. आधी भावाला टिळा लावा. त्यानंतर राखी बांधा आणि आरती ओवाळा. यानंतर त्याला गोड पदार्थ भरवून मंगल कामना करा. तर भावानेही बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यावे.