Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Politics : ठाकरे गटासह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Politics : ठाकरे गटासह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : धारावीतील काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज ठाकरे गटातील माजी नगरसेवक उपेंद्र सावंत (Upendra Sawant) यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला.


सावंत हे मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर भागातील माजी नगरसेवक असून ते संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत यांच्या जवळचे होते.


सोशल मीडियावर प्रसारीत झालेल्या फोटोंमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी नगरसेवकाचे स्वागत करताना आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना दिसतात. यावेळी सावंत यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही होते. गेल्या वर्षी जूनमध्ये बंड केल्यानंतर शिंदे गटाने आतापर्यंत ठाकरे गटातील १५ माजी नगरसेवकांना आपल्या गोटात सामावून घेतले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २६ ऑगस्ट रोजी धारावीतील काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.


या पाच माजी नगरसेवकांनी शनिवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यातील बहुसंख्य लोक धारावी विधानसभा क्षेत्रातील आहेत.


सायन कोळीवाड्यातील पुष्पा कोळी, धारावी येथील भास्कर शेट्टी, बब्बू खान आणि कुणाल माने आणि चांदिवली येथील वाजिद कुराशी यांचा यात समावेश आहे. शिंदे गटात सामील होण्याच्या निर्णयामागे त्यांनी गायकवाड यांच्या कार्यशैलीला जबाबदार धरले आहे.


दरम्यान, अंधेरीतील काँग्रेसच्या आणखी एक माजी नगरसेविका सुषमा राय यांनी यापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. हे पक्षांतर दोन्ही पक्षांना धक्का देणारे आहे.

Comments
Add Comment