Monday, July 15, 2024
Homeदेशजी २० परिषद : पाहुण्यांना नाही वाढले जाणार हे पदार्थ, पहिल्यांदा मेन्यूमध्ये...

जी २० परिषद : पाहुण्यांना नाही वाढले जाणार हे पदार्थ, पहिल्यांदा मेन्यूमध्ये नसणार हे पदार्थ

नवी दिल्ली : जी २० शिखर परिषदेसाठी दिल्लीमद्ये जोरदार तयारी सुरू आहेत. दिल्लीचे सजवलेले रस्ते या परिषदेचे महत्त्व सांगतात. रस्त्यांची सुंदरता वाढवण्यासाठी रंगरंगोटी तसेच लायटिंगचे काम जोरात सुरू आहे. दिल्लीमध्ये सुरक्षाही जोरात आहे. यातच जी २० शिखर परिषदेशी संबंधित आश्चर्याची बातमी समोर आल ीआहे. सूत्रांनी या संमेलनात परदेशी पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या मेन्यूविषयी खुलासा केला आहे.

सूत्रांनी सांगितले भारतात जी २०च्या परिषदेत पाहुण्यांना शाकाहारी भोजन दिले जाणार आहेजो . सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज खाणे दिले जाणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पासून ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग सर्व पाहुण्यांना भारतातील विविध शाकाहारी मेन्यू दिले जाणार आहे.

जी २० परिषदेत जितके परदेशी पाहुणे आहेत त्यात काही राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्र प्रमुख सामील आहेत या सर्वांना व्हेजिटेरियन जेवण दिले जाणार आहे. भारतीय पदार्थांमध्ये काश्मीर ते कन्याकुमारपासून विविध राज्यांचे प्रसिद्ध पदार्थ वाढले जाणार आहेत. या परिषदेत कोणत्याही प्रकारचे मांसाहारी जेवण दिले जाणार नाही.

परदेशी मीडियासाठी जे खाण्याचे पदार्थ दिले जाणार आहेत. त्यात शुद्ध व्हेजिटेरियन खाण्याचा समावेश असणार आहे. Media delegationमध्ये साधारण साडेतीन हजार लोक असणार आहेत. त्या सर्वांची प्रगती मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -