Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

रक्षाबंधनच्या दिवशी दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

रक्षाबंधनच्या दिवशी दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना


पिंपरी : रक्षाबंधनच्या दिवशी पिंपरी-चिंचवड येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चिखली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, चिखली परिसरात असलेल्या सचिन हार्डवेअर या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली. यावेळी दुकानात वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबीयांचा ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुकानामध्ये अजून एक व्यक्ती अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून अडकलेल्या व्यक्तीचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.


ही आग नेमकी कशी लागली हे कुटुंबिय मुळचे कुठले होते याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसून, शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू असून, अडकलेल्या व्यक्तीचादेखील शोध घेतला जात आहे. आज रक्षाबंधनाचा सण आहे आणि याच दिवशी एकाच कुटुंबातील चौघाजणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment