Saturday, May 24, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mission 350 : 'मिशन ३५०' साठी भाजपचा मोठा 'प्लॅन'

Mission 350 : 'मिशन ३५०' साठी भाजपचा मोठा 'प्लॅन'

देशभरात कॉल सेंटर उघडणार, मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मोठा प्लॅन


नवी दिल्ली : पुढील वर्षी देशभरात होणा-या लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच २०२४ मध्ये देशात कमळ फुलेल, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. भाजपशी सामना करण्यासाठी हतबल झालेल्या विरोधकांनीही आता एकत्र येण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. विजयाच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाकडून अगदी सुक्ष्म नियोजन केले जात आहे. भाजपकडून ३५० प्लससाठी आतापासूनच नियोजन केले जात असून एकहाती विजयासाठी भाजपकडून पक्ष बूथ स्तरावर लक्ष केंद्रित केले जात आहे. तसेच देशाच्या विविध भागात कॉल सेंटर्स उघडून मिशन ३५० पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.


मंगळवारी (दि. २९) भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेऊन निवडणूक लढाई जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले. यात देशभरात कॉल सेंटर सुरू करून मतदारांपर्यंत पोहोचण्याची योजना आखण्यात आली आहे. तर नगर पंचायत अध्यक्ष आणि नगराध्यक्षांच्या परिषदा सुरू करण्याची रणनीती देखिल आखण्यात आली आहे.


भाजपने २०२३ मध्ये राज्यांमध्ये सत्तेवर येण्यासाठी आणि २०२४ मध्ये ३५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची ब्लू प्रिंट तयार केली आहे. पार पडलेल्या या मॅरेथॉन बैठकीत २०२४च्या लोकसभा निवडणुका तसेच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या कार्यक्रमांची रूपरेषाही ठरविण्यात आली आहे. त्यामुळे भाजप पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.


२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ग्रामीण मतांचे शहरी मतांमध्ये रूपांतर करण्याची योजना आखली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील जिल्हा पंचायत अध्यक्षांना निवडणूक व्यवस्थापनात तज्ज्ञ असलेल्या भाजप नेत्यांकडून ग्रामीण भागातील मतदारांना कशी मदत करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.


शहरी मतांवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी स्थानिक नागरी संस्थांच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याची सविस्तर रणनीती या बैठकीत आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी ब्लॉक प्रमुख आणि बीडीसींना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचा अहवाल सादर केल्याचेही सांगितले जात आहे. यासोबतच जिल्हा पंचायत सदस्यांच्या प्रशिक्षण वर्गाचा अहवाल सादर करून ब्लॉक पंचायत स्तरावरील सदस्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले.



मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मोठा प्लॅन


या बैठकीत जेपी नड्डा यांनी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी १५ दिवस देशभर सेवा कार्य करण्याच्या योजनेवर चर्चा केली. ज्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून सेवा कल्याण कार्यांच्या माध्यमातून कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी लवकरच परिपत्रक जारी केले जाणार आहे.



देशभरात कॉल सेंटर उघडणार


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात कॉल सेंटर सुरू करण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या विस्तृत योजनेवर सखोल चर्चा करण्यात आली. देशभरात सुरू होणारी कॉल सेंटर्स आणि त्यांच्या कामकाजाबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते लवकरच ब्लू प्रिंट तयार करून त्याची अंमलबजावणी करणार आहेत. यासाठी भाजप लवकरच एक मोठी बैठक घेणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment