Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीBARC Scientist Suicide : भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या

BARC Scientist Suicide : भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या

मुंबई : मुंबईतल्या भाभा अणूसंशोधन केंद्र म्हणजेच, भाभा अणु संशोधन केंद्रामधील (Bhabha Atomic Research Centre) ५० वर्षीय शास्त्रज्ञाने सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली. मनीष सोमनाथ शर्मा असे मृत शास्त्रज्ञांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष यांनी सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या साह्याने पंख्याला लटकून गळफास घेतला. पत्नी नीतू हिने शेजारी राहणाऱ्यांच्या मदतीने मनीष शर्मा यांना ॲम्बुलन्सने बीएआरसी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -