Monday, July 8, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेला आजपासून सुरूवात

Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेला आजपासून सुरूवात

मुंबई: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा आज डबलडोस आहे. आज ते रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत. तर दुसरीकडे क्रिकेटच्या सामन्याची मजा घेता येणार आहे. आशिया चषक (asia cup) स्पर्धेतील पहिला सामना आज म्हणजेच ३० ऑगस्टला पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात रंगत आहे.

या सामन्यासोबतच तब्बल १५ वर्षांनी पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे पुनरागमन होतेय. पाकिस्तान क्रिकेटसाठी २००९मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा प्रवास खूप कठीण होता. यानंतर पाकिस्तानने चॅम्पियन ट्रॉफीच्या यजमानपदाचे अधिकार गमावले होते. याशिवाय २०११मध्ये वर्ल्डकपमध्ये संयुक्त यजमानपदही गमावले होते.

दहशतवादी धोक्यामुळे पाकिस्तानकडे यजमानपद नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सदस्य देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा केला नाही. त्यामुळे पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकला नाही. त्यामुळे आशिया चषकातील हे चार सामने पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहेत. ज्यामुळे त्यांना २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळू शकते.

आशिया कप २०२३ चे पूर्ण वेळापत्रक

३० ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

३१ ऑगस्ट: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसार)

२ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसा)

३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर, दुपारी १:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

४ सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसार)

५ सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

६ सप्टेंबर: A1 वि B2, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

९ सप्टेंबर: B1 वि B2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१० सप्टेंबर: A1 वि A2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१२ सप्टेंबर: A2 vs B1, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१४ सप्टेंबर: A1 वि B1, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१५ सप्टेंबर: A2 vs B2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१७ सप्टेंबर: TBC vs TBC, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -