Monday, July 8, 2024
Homeक्रीडाAsia cup 2023 : बाबर आझमने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बनवला विक्रम, कोहलीला टाकले...

Asia cup 2023 : बाबर आझमने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बनवला विक्रम, कोहलीला टाकले मागे

मुंबई: आशिया कप २०२३च्या (asia cup 2023) पहिल्या सामन्यातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे (pakistan babar  रौद्र रूप पाहायला मिळाले. बाबर आझमने नेपाळविरुद्ध मुल्तानमध्ये खेळवण्यात आलेल्या आशिया कप २०२३मधील पहिल्याच सामन्यात धमाकेदार अंदाजात शतक ठोकले. बाबर आझमने तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करताना १०९ बॉलमध्ये शतक ठोकले. बाबर आझमचे वनडे करिअरमधील हे १९वे शतक आहे. बाबर आझम पाकिस्तानसाठी वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १९ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानसाठी वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम माजी फलंदाज सईद अन्वरच्या नावावर आहे. सईद अन्वरने पाकिस्तानसाठी वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २० शतके ठोकली आहेत.

बाबर आजमने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

नेपाळविरुद्ध मुल्तानमध्ये खेळवल्या जात असलेल्या आशिया चषक २०२३च्या पहिल्या सामन्यात बाबर आझमने आपल्या वनडे आंतरराष्ट्रीय करिअरमधील १९वे शतक ठोकले आहे. बाबर आझमने यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १९ शतके पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. बाबर आझमने याबाबतीत भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहली आणि द. आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमलाला मागे टाकले.

बाबर आझम १३१ बॉलमध्ये १५१ धावा करून बाद झाला. बाबर आझमने आपल्या या डावात १४ चौकार आणि ४ षटकार लगावले.

वनडेत सर्वाधिक १९ शतक ठोकणारे फलंदाज

बाबर आझम(पाकिस्तान) १०२ डाव
हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) १०४ डाव
विराट कोहली (पाकिस्तान) १२४ डाव
डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) १३९ डाव
एबी डे विलियर्स (दक्षिण आफ्रिका) १७१ डाव

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबर आझमचा रेकॉर्ड

वनडे – १९ वनडे शतक
कसोटी – ९ शतक
टी २० – ३ शतके

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -