नवी दिल्ली: चीनने (china) जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश (arunachal pradesh) त्यांचा भूभाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र भारांताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. जयशंकर यांनी मंगळवारी एका न्यूज चॅनेलशी बोलताना चीनच्या या कावेगिरीबद्दल सांगितले, असे निरर्थक दावे करून दुसऱ्यांचा भूभाग आपला होत नाही. त्या प्रदेशावर दावा करण्याची चीनची जुनी सवय आहे. याने काही बदलणार नाही. त्यांनी जो नकाशा सादर केला त्याला काही अर्थ नाही.
चीनने सोमवारी नवा नकाशा जाहीर केल्यानंतर जयशंकर यांनी हे विधान केले आहे. चीनने सादर केलेल्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश राज्य आणि अक्साई चीन भाग त्यांच्या भूभागाचा हिस्सा असल्याचे दाखवले. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की आमचे सरकार याबाबत खूप स्पष्ट आहे की हे आमचे क्षेत्र आहे आणि तेथे आम्हाला काय करायचे आहे? अशा पद्धतीचे निरर्थक दावे करून दुसऱ्या लोकांचा प्रदेश तुमचा होत नाही.
गेल्या आठवड्यात चीनचे शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील अनौपचारिक बातचीतदरम्यान एलएसी आणि भारत-चीन सीमासह अन्या क्षेत्रांमवरील न सुटलेले मुद्दे उठले होते. पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना भारताच्या चिंतांबाबत सांगितले होते.