ॲक्सिस बँकेच्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण प्रसंगी व्यवस्थापनाने दिले आठवडाभरात सर्व प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन
मुंबई : वरळी येथील ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank) मुख्य कार्यालयात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कामगारांची गेली पाच वर्ष रखडलेली पगारवाढ व हक्काचा मिळणारा D.A. बंद करण्यात आल्यामुळे आमदार नितेश राणेंकडून बॅंकेला इशारा देण्यात आला. व्यवस्थापनाकडून आठवड्याची वेळ मागून घेण्यात आली आहे. सर्व प्रलंबित प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांना व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे.
यावेळी सरचिटणीस प्रवीण नलावडे, ॲक्सिस बँक युनिट पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra