Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाKL Rahul: के एल राहुलने वाढवले टीम इंडियाचे टेन्शन

KL Rahul: के एल राहुलने वाढवले टीम इंडियाचे टेन्शन

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ची (asia cup 2023) सुरूवात ३० ऑगस्टपासून होत आहे. यानंतर भारतीय संघाला (team india) येथेच वनडे वर्ल्डकप (one day world cup) खेळायचा आहे. मात्र त्याआधी भारताचा स्टार विकेटकीपर केएल राहुलने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे. तो नुकताच दुखापतीतून बरा होत परतला आणि त्याची आशिया कपसाठी निवड करण्यात आली.

मात्र राहुल अद्याप पूर्णपणे फिट नाही. त्याला हलकीशी दुखापत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की केएल राहुल आशिया कपच्या सुरूवातीच्या दोन सामन्यात खेळणार नाही. ही माहिती मिळताच चाहत्यांची भीती आणखी वाढली की राहुलची दुखापत वर्ल्डकपचा खेळ बिघडवू नये. वर्ल्डकप ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाणार आहे.

अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे राहुल

भारतीय संघ आशिया कपच्या सुरूवातीच्या सामन्यात २ सप्टेंबरला पाकिस्तान आणि त्यानंतर ४ सप्टेंबराला नेपाळशी भिडणार आहे. राहुल या दोन्ही सामन्यात संघाचा भाग नाहीये. तो स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये संघासोबत असेल. राहुलची ही दुखापत गेल्या दुखापतीशी संबंधित नाही. राहुल जांघेला झालेल्या दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे.

त्याला जांघेची दुखापत बरी झाल्यानंतर बुधवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात विकेटकीपर फलंदाज म्हणन सामील केले होते. द्रविडने आशिया कपच्या रवानगीआधी पत्रकार परिषदेत सांगितले, केएल राुलने आमच्यासोबत चांगला आठवडा घालवला. तो चांगला खेळ करत आहे. वास्तवात चांगली प्रगती करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -