Wednesday, April 30, 2025

ताज्या घडामोडी

वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी घेताना वडील-मुलगा बुडाले, शोध सुरू

वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी घेताना वडील-मुलगा बुडाले, शोध सुरू

मुंबई: मुंबईच्या वसईस्थित (vasai) किल्ल्याजवळील समुद्रकिनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी दुख:द घटना घडली. यावेळी सेल्फी (selfie) घेत असताना वडील आणि मुलगा बुडाले. तेथे उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. प्रकरणात वसई पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे.

बाईकच्या नंबरवरून झाली ओळख

वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसईच्या किल्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बाईकच्या आधारावर त्यांची ओळख करण्यात आली. शैलेष गजानन मोरे आणि देवेंद्र अशी बेपत्ता व्यक्तींची नावे आहेत. शैलेष डेंटिस्ट आहेत. तसेच देवेंद्र नवव्या इयत्तेत शिकत होता.

सेल्फी घेत असताना बुडले

पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली. घरात पुजेनंतर शैलेष आणि देवेंद्र पुजेचे साहित्य समुद्राच्या प्रवाहात सोडण्यासाठी आले. ते आपल्या बाईकवरून समुद्रकिनाऱ्यावर गेले आणि पुजेचे साहित्य सोडण्यासाठी त्यांनी बाईक समुद्रकिनाऱ्यावर लावली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि मुलगा सेल्फी घेत होते. तेव्हा अचानक देवेंद्र समुद्रात पडला. त्याला वाचवण्यासाठी शैलेष यांनीही उडी घेतली. मात्र ते ही मुलासोबत बुडाले. घटनेनंतर दोघेही बेपत्ता आहेत.

पोलिसांनी सुरू केला तपास

वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंजीत आंधळे म्हणाले,या प्रकरणी केस दाखल केली आहे आणि तपास सुरू आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सेल्फी घेताना वडील आणि मुलगा पाण्यात बुडाले.

Comments
Add Comment