World Cupसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा, तारीख ठरली

नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेसाठी (asia cup) भारतीय संघाने (indian team) कंबर कसून तयारी केली आहे. मात्र संघाचे खरे मिशन आहे ते म्हणजे वर्ल्डकप (world cup). वर्ल्डकपसाठी सर्व संघांच्या क्रिकेट बोर्डना सप्टेंबरपर्यंत आपले संघ जाहीर करायचे आहेत.


भारतीय संघात सध्याच्या घडीला काही खेळाडूंबाबत सातत्याने साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अनेक दिग्गज खेळाडू वर्ल्डकपसाठी आपापले संघ जाहीर करत आहेत. मात्र चाहत्यांना भारतीय संघाची प्रतीक्षा आहे. यासाठी दोन तारखा समोर आल्या आहेत जेव्हा क्रिकेट मंडळ या मोठ्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करू शकतो.


असे मानले जात आहे की जो संघ आशिया कपसाठी निवडण्यात आला आहे तोच संघ वर्ल्डकपमध्ये विरोधकांना टक्कर देईल. मात्र केएल राहुल, श्रेयस अय्यर हे खेळाडू नुकतेच दुखापतीतून सावरत आहेत. दोघांना सरळ आशिया चषकमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याआधी ते एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत.


त्यामुळे त्यांचा खेळ न पाहता वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करणे हे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. याशिवाय काही खेळाडूंबाबत साशंकता आहे. हे पाहता ३ अथवा ४ सप्टेंबरला बीसीसीआयकडून वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली जाऊ शकते



भारत-पाकिस्तान सामना महत्त्वाचा


भारतीय संघाचा आशिया चषकाच्या सुरूवातीलाच पाकिस्तानशी सामना रंगणार आहे. या सामन्याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेच्या पल्लेकल स्टेडियममध्ये रंगणार आहे.

Comments
Add Comment

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास