इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (pakistan former prime minister imran khan) सध्या तुरुंगात बंद आहेत. मात्र तुरुंगातही(jail) त्यांना शाही वागणूक मिळत आहे. इम्रान खान यांना देशी तुपात बनलेले मटण तसेच चिकन दिले जाते. यासंबंधाचा रिपोर्ट पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टात अटॉर्नी जनरल कार्यालयाच्या एका रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. यात देशी तुपात बनवलेले मटण आण चिकनचाही समावेश आहे.
माजी पंतप्रधानाच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त
या महिन्याच्या सुरूवातीला तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर इम्रान खान तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. अधिकाऱ्यांनी इम्रान यांना दिल्या जाणाऱ्या सुविधेचाही तपास करत आहेत. सोबतच त्यांच्या गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी त्यांच्या बॅरेकमध्ये कॅमेऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास केला.
इम्रानला जेलमध्ये मिळतायत या सुविधा
तुरूंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान यांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. यात एक शानदार बेड, खुर्ची, एअर कूलर, प्रेयर रूम, कुराण, पुस्तके, थर्मास, खाणे, व्यक्तिगत सामान आणि मेडिकल टीमचाही समावेश आहे. इम्रान यांना एक वेस्टर्न टॉयलेट, वॉश बेसिन, खजूर, मध, टिश्यू पेपरही दिला जात आहे.
माजी पंतप्रधानांच्या तपासणीसाठी पाच डॉक्टरांना नियुक्त करण्यात आले आहे. यात प्रत्येक जण आठ तास काम करतात.
इम्रानच्या कुटुंबियांना व्यक्त केली ही शंका
इम्रान खान यांना तुरुंगात धाडल्याने त्यांचे कुटुंबीय आणि पक्ष यांच्या चिंता वाढल्या आहेत. पीटीआयच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की त्यांना भीती आहे की इम्रान यांना खाण्यातून विष दिले जाऊ शकते. या शंकेमुळेच त्यांना घरातून जेवण तसेच पाणी ऑर्डर करण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी केली होती. मात्र ती मागणी फेटाळून लावली.