Tuesday, July 1, 2025

Health Department: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज, आरोग्य विभागात मेगा भरती

Health Department: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज, आरोग्य विभागात मेगा भरती

मुंबई: बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने (state government) नोकरीची मोठी सुवर्णसंधी आणली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य विभागाची (health department) भरती प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया आता सुरू होणार आहे. आरोग्य विभागात तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.


आरोग्य विभागातील या भरतीसाठीची जाहिरात मंगळवारीच प्रसिद्ध केली जाणार आहे. २०२१मध्ये आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवेळेस पेपरफुटीचा प्रकार घडला होता. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवली गेली होती. त्यामुळे या सरकारवर या भरतीसाठी सरकारवर एकप्रकारचे दबाव होता.


त्यानंतर आता या महायुतीच्या सरकारमध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जे बेरोजगार तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे.



या पदांसाठी भरती


या भरतीच्या प्रक्रियेत क आणि ड संवर्गातील विविध ६० प्रकारची मिळून एकूण १० हजार ९४९ पदे असणार आहेत. ही प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसकडून राबवली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

Comments
Add Comment