Friday, May 23, 2025

क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

World Athletics Championship : नीरज चोप्राने रचला इतिहास

World Athletics Championship : नीरज चोप्राने रचला इतिहास

बुडापेस्ट: जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या (World Athletics Championship 2023) शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ ऑगस्टला सर्वांच्या नजरा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रावर (neeraj chopra) होत्या. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेतील अंतिम फेरीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र भारताच्या नीरज चोप्रासमोर सारे फेल ठरले.


या फायनलआधी जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या खात्यात एकही सुवर्णपदक नव्हते. मात्र नीरज चोप्राने इतिहास रचत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा झेंडा फडकावला.


नीरज चोप्राने भालाफेक च्या राऊंड थ्रीमध्ये ८८.७७ मीटर भाला फेकत फायनलमध्ये शानदार एंट्री घेतली होती. ही त्याची या हंगामातील जबरदस्त कामगिरी होती. हाच जोश फायनलमध्येही पाहायला मिळाला. दरम्यान, नीरज चोप्राने आपल्या पहिल्या बाजीत सर्व चाहत्यांचा श्वास रोखून धरला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने पुनरागमन केले आणि भाला ८८.१७ मी पर्यंत फेकला. त्याच्या या प्रयत्नानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.






भारत-पाकिस्तान रंगला मुकाबला


नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अरशदने आपल्या सर्वोत्कृष्ट बाजीमध्ये ८७.८२ मी लांब भाला फेकला. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या बाजीमध्ये अरशद गोल्डन बॉयपेक्षा पुढे राहिला. मात्र नीरज चोप्राच्या पहिल्या फेरीशी कोणालाच बरोबरी करता आली नाही. अखेर नीरज या स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

Comments
Add Comment