Sunday, June 30, 2024
Homeताज्या घडामोडीGaneshotsav : राजकुमार रावचा इको-फ्रेंडली गणपती पाहिलाय का?

Ganeshotsav : राजकुमार रावचा इको-फ्रेंडली गणपती पाहिलाय का?

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून संपूर्ण भारतभर गणेशोत्सव (Eco-friendly Ganeshotsav) हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सगळ्यांचा उत्साह आता जोरदार वाढला असून यात बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) देखील मागे नाही. तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतो.

टिकाऊ साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती तयार करून तो हा सण साजरा करणार असल्याचं समजतंय या मधून त्यांच्या पर्यावरणाशी असलेली बांधिलकी देखील दिसून येते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपला दृष्टिकोन मांडला, “मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. मी राजमा बीन्स वापरून डोळे बनवतो आणि मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. मग मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळ सुख आहे.”

राजकुमार राव हा बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग वापरून अनोख्या पद्धतीने हा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करतो. राजकुमार राव याचे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे समर्पण ही सगळ्यांना एक प्रेरणा देऊन जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -