Wednesday, April 30, 2025

देशमहत्वाची बातमी

Chandrayaan-3:चांद्रयान ३च्या रोव्हरच्या वाटेत आला मोठा खड्डा, प्रज्ञानने बदलला असा मार्ग

Chandrayaan-3:चांद्रयान ३च्या रोव्हरच्या वाटेत आला मोठा खड्डा, प्रज्ञानने बदलला असा मार्ग

नवी दिल्ली : चांद्रयान ३च्या (chandrayaan 3) रोव्हर प्रज्ञानने (rover pragyaan चंद्राच्या पृष्ठभागावर खड्डा पाहत आपला मार्ग बदलला आहे. हा खड्डा म्हणजेच क्रेटर ४ मीटर व्यासाचा आहे. हा खड्डा रोव्हरच्या समोर साधारण ३ मीटर दूर होता. आता रोव्हर नव्या मार्गावर चालत आहे. रोव्हर छोटे-मोठे खड्डे तर पार करू शकतो. मात्र मोठे खड्डे नाही. मात्र त्याच्यासमोर मोठा खड्डा आला तर त्याने आपला रस्ता बदलला.

आतापर्यंत रोव्हरने ८ मीटर म्हणजेच २६ फूटपेक्षा जास्त अंतर पार केले आहे. त्याचे दोनही पेलोड्स सुरू आहेत. काम करत आहे. याशिवाय इस्त्रोने प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हरचे सर्व पेलोड्स काम करत आहेत. तिघांचे कम्युनिकेशन बंगळुरू स्थित सेंटरमध्ये आहे.

 

इस्रोने सांगितले की रोव्हर, लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचे कार्य सुरळीत आहे. सर्व पेलोड्स म्हणजे त्यातील यंत्रे सुरळीत काम करत आहे.

रोव्हरमध्ये कोणते आहेत पेलोड्स?

प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य पद्धतीने काम रत आहे. रोव्हरवर दोन पेलोड्स लागले आहेत. पहिला लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्को. हा एलिमेंट कंपोझिशन स्टडी करणार. जसे मॅग्नेशियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त आणि लोह.

दुसरे पेलोड आहे अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर. हा चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले केमिकल्स म्हणजेच रसायनांची मात्रा आणि गुणवत्तेचा अभ्यास करणार आहे. सोबतच खनिजांचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment