Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीAsia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस ठरणार निर्णायक!

Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस ठरणार निर्णायक!

नवी दिल्ली : आशिया कप (asia cup) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्याची सगळेच चाहते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहे. रोहित शर्मा अँड कंपनी २ सप्टेंबरला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत.

श्रीलंकेच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कंबर कसून सज्ज आहेत. कँडीच्या मैदानावर या हाय वोल्टेज सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. हे आम्ही नव्हे तर पल्लिकल स्टेडियमचे आकडे सांगत आहेत.

आशिया कपआधी एकीकडे टीम इंडिया नेट्समध्ये सराव करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळ केला. यावरून दिसते की दोन्ही संघ एकदम तयारीनिशी या स्पर्धेत उतरणार आहेत. दरम्यान, दोन्ही संघादरम्यानच्या खेळामध्ये टॉस महत्त्वाचा ठरणार आहे.

कँडीच्या मैदानावर वनडे फॉरमॅटचा आकडा पाहिला तर पाठलाग कऱणाऱ्या संघाला मोठा फायदा मिळतो. या मैदानावर आतापर्यंत ३३ वनडे सामने खेळवण्यात आले. त्यात आधी पाठलाग करणाऱ्या संघाने १८ सामने जिंकले आहेत.

अनेकदा टॉस जिंकल्यानंतर कर्णधार पहिल्यांदा फलंदाजी करणे पसंत करतात. याच कारणामुळे सुरूवातीला पिच फलंदाजांच्या बाजूने असते. मात्र वेळेसोबतच ही पिच स्पिनर्सला मदत करण्यास सुरूवात करते. यामुळे रोहित शर्मा टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -