
आमदार नितेश राणे यांनी केली उद्धव ठाकरेंच्या वस्त्रहरणाला सुरुवात
मुंबई : आम्ही उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करतो तेव्हा आमची जीभ घसरली अशी टीका करतात. परंतु एका उपमुख्यमंत्र्यांवर बोलताना कुठल्याही मीडियाने उद्धव ठाकरेंची जीभ घसरली असे म्हटले नाही. आणि आता जेव्हा उद्धव ठाकरेंची जीभ घसरली जाईल तेव्हा सूत समेत परत देणं हाच महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे. हिंदूदृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे की, अंगावर आले तर शिंगावर घ्या. आता उबाठा अंगावर आलीच आहे तिला आम्ही शिंगांवर घेऊ, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांचा नोकर संजय राजाराम राऊत यांचे वस्त्रहरण करत अतिशय गंभीर आरोप केले आहेत. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना उबाठा गटाची भंबेरी उडाली आहे.
उद्धव ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले, आता जे जे बाहेर येईल ते ऐकून घरात बसून रडायचे नाही, लपून बसायचे नाही. एक मुद्दा मला स्पष्ट करावासा वाटतो की, काल स्वर्गीय नितीन देसाई (Nitin Desai) यांच्याबाबत अग्रलेख लिहिला गेला, त्यांच्यावर अन्याय झाला असं लिहिण्यात आलं. नितीन देसाई एक चांगले व्यक्ती होते. फार मेहनती होते आणि माझे वैयक्तिकही त्यांच्याशी चांगले संबंध होते. पण त्यांचा स्टुडिओ त्यांनी विकत द्यावा आणि तो आम्हाला द्यावा असा कुणाचा दबाव त्यांच्यावर होता? माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना तो हवा होता, म्हणून देसाईंवर जोरजबरदस्ती केली गेली. मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून नितीन देसाई यांना धमक्या देण्यात येत होत्या. हे सांगत असताना आम्हाला कोणाच्याही मृत्यूवर राजकारण करायचं नाही, असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, तुझा जो ठाकरे सिनेमा आला त्याचं शूटिंग एन डी स्टुडिओत झालं. पण त्याचे पैसे दिलेत का? की फुकट वापरला? गेलेल्या माणसावर घाणेरडं राजकारण करणं ही सडकछाप संजय राऊतची वृत्ती आहे. आता सनी देओल आणि नितीन देसाईंबदद्ल बोलताय मग मविआच्या काळात मराठी कलाकारांना का मोठं केलं जायचं नाही? महापालिकेची सर्व कंत्राटं दिनू मौर्यला का दिली जायची? तेव्हा नितीन देसाईंची आठवण झाली नाही का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे 'हड्डीचं दुकान'
मी उद्धव ठाकरे याला नपुंसक, बायल्या म्हटलं तर बोभाटा होणार. पण ज्या माणसाला धड उभं राहता येत नाही, 'हड्डीचं दुकान' म्हणून ज्याला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. जो जेवण चमच्याने घेतो की दाताने फावडा मारतो हे अजूनपर्यंत माहाराष्ट्राला माहित नाही, तो दुसर्यावर टीका करण्याची हिंमत करतोय? तुझा पक्ष आणि चिन्ह तरी तुझ्याकडं राहिलंय का? अशी टीका नितेश राणे यांनी केली.
स्वतःच्या बापाला म्हातारा आणि कुत्रा म्हणायचे
ज्याने उद्धव ठाकरेंना स्वतःच्या सख्ख्या भावाप्रमाणे सांभाळलं त्यांच्याबाबत हे तक्रार करतायत. माझा बाप चोरला म्हणतात. पण स्वतःच्या वडिलांना तू आणि तुझे कुटूंब म्हातारा आणि कुत्रा म्हणायचे, नावं ठेवायचे. तो म्हातारा जेवला का असं हे म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे जी रुद्राक्षाची माळ घालायचे ती यांनी फेकून दिली. म्हणून उगाच बाळासाहेबांविषयी प्रेम दाखवत असशील तर तुझं काय वस्त्रहरण करायचं हे आम्ही बघतो.
कंगना रणौत आणि नवनीत राणाकडून राखी बांधून दाखव
उद्धव म्हणतात की पंतप्रधान मोदींनी बिलकीस बानोकडून राखी बांधून घ्यावी. पण ते सोड, तू आधी कंगना रणौत आणि नवनीत राणाकडून राखी बांधून दाखव. नाही तुझं थोबाड रंगवून परत मातोश्रीला पाठवलं तर नाव नितेश राणे लावणार नाही, अशा आक्रमक पद्धतीने ते बोलत होते.
तू खरंच बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहेस का?
हिंदुत्वाचा तू सूर्याजी पिसाळ आहे. तू हिंदुत्वासोबत गद्दारी केलीस त्यामुळे तू खरंच बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहेस का हे चेक करायला हवे. 'शासन आपल्या दारी' वर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, मविआच्या काळात 'शासन होतं आजारी आणि यांचा मुलगा नाचायचा संध्याकाळी दिनोच्या घरी', असा नितेश राणे यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.